.post img {

Monday, 2 October 2017

Court (कोर्ट) 2016.... Film with Truth..

कोर्ट..

आपल्यातल्या बऱ्याच लोकानां कोर्ट हे एकदम Dramatic.. जोरदार Arguments होणारे आणि पिक्चर संपायच्या आत निकाल लावणारे एवढंच माहीत...

कृपा फ़क्त बॉलीवुड ची... :)

तारीख पे तारीख.. आपको जो कुछ कहना है कटगरे में आ के कहिये... इत्यादि इत्यादि डायलॉग्स आपल्याला पाठ...।।

पण दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे यांचे कोर्ट चित्रपटापेक्षा थोड़े वेगळे आहे... 

आहे एकदम खरे खुरे... 

कथा एकदम सोपी सरळ.... पण तरीही प्रेक्षकांना विचार करायला लावणारी.. 


एक लोकशाहीरनारायण कांबळे जो अगदी सत्तरी च्या वयामध्ये कुठल्याही अन्यायाविरुध्ह आपल्या पोवाड्यांमधून निषेध करणारा व सरकार ला चार शब्द सुनावणारा... त्याला रोखण्यासाठी काहीही संबंध नसलेले गुन्हे लावणारी पोलीस यंत्रणा... (अर्थातच सरकार)... लावलेले चार्जेस कितीही हास्यास्पद असले तरी पोलिसांचा तो खरा करण्यासाठी आटापिटा... 


कोर्टाच्या तारखा कश्या छोट्या छोट्या कारणामुळे पुढे ढकलल्या जातात...आणि त्या पुढे ढकलणे पोलिसांना किती सोपे असते... त्यामध्ये बिचाऱ्या निरपराध माणसांना पण कित्येक वर्षे खेटा मारत बसावे लागते...!! आणि मुळात आपले बरेचसे कायदे पण अजून 1857 च्या काळातले आहे हे हि निक्षून दिसून येते...!!

कथानका सोबतच दिग्दर्शकाने वेध घेतला आहे वकिलांच्या जीवनाचा...

एक म्हणजे नारायण कांबळे न Defend करणारा खाजगी वकील.. एका उच्च गुजराती घरातला आणि passion म्हणून वकिली करणारा...
दुसरी म्हनजे सरकारी वकील... जी ला फक्त समोर आलेली केस संपवण्याची घाई असलेली.. त्याच बरोबर घरी जाऊन आपला छोटासा संसार सांभाळण्याची जबाबदारी...!!

इतकं रियल वाटणारे कोर्ट आणि चित्रीकरण मनाला खूपच भावते... एकाही दृश्या मध्ये शुटींग कडे बघणारा कुणी व्यक्ती दिसत नाही.. जे साध्य करणे भारतामध्ये तर अशक्य च आहे...!! पोवाडे पण खूप छान आणि दमदार आहेत...!!

Something Real दाखवायचे असल्यामुळे चित्रपट थोडा Slow आहे.. पण जर वेगळे काही पहायचे असेल तर तेवढे सहन करायला काही हरकत नाही... Its like OPERA.. Slow But Classic..!!

शेवटच्या एका खूप सोप्या दृश्यातून पूर्ण चित्रपटाचे सारांश दाखवला आहे... फक्त तो जाणून घ्यावा लागतो..
जज आपल्या family सोबत पिकनिक ला गेल्यानंतर त्याची बागेत सहज डुलकी लागलेली असते.. तेवढ्यात त्यांच्यातील छोट्या मुलांचा घोळका येतो व त्याला ते मजा म्हणून जोरात ओरडून भीती दाखवतात.. त्यावेळी अचानक दचकलेल्या त्या जज च्या हाती असा मुलगा सापडतो जो मुळात ओरडलेला च नसतो.. आणि त्या बिचाऱ्या मुलाला मार खावा लागतो...!!

अगदी अशीच आहे आपली न्यायव्यवस्था... गुन्हा घडताना न्यायव्यवस्था झोपलेली असते.. कुणीतरी गुन्हा करते... मग दचकलेली व्यवस्थाजो कोणी हाती सापडेल त्याला हाती धरून शिक्षा देते... कदाचित पकडलेला खरा गुन्हेगार असतो आणि बर्याच वेळा निर्दोष सुद्धा असू शकतो ...आणि निर्दोष असला तरी निकाल लागेपर्यंत बरीच वर्षे विनाकारण शिक्षा भोगावी लागतेच..!!

नक्की पहा...!! आपले कोर्ट..!!
No comments:

Post a Comment