वाटाड्याच तो..
जशी वाट दाखवू शकतो तशी वाट लावू पण शकतो..
कधी काटाकुट्यातून नेईल, तर कधी पायघड्या टाकलेल्या रस्त्यावरून..
काटाकुट्यातून घेऊन गेला म्हणून तो वाईट असेलच असे नाही..
आणि चकचकीत रस्त्यावरून नेले म्हणून तो हितचिंतक असेलच असे नाही...
एखादा नुसती वाट सांगू शकेल किंवा अगदी पोहचेपर्यंत सोबत पण करू शकेल..
पोहचवणारे सुद्धा बरेच मिळतील..
कुणी देवाच्या मंदिरापर्यंत, कुणी मदिरे पर्यंत तर कुणी सरळ देवाघरी पोहोचवेल..
असतो कि नाही आपला वाटाड्या महत्वाचा..
खूप जण तुम्हाला आधीच तयार असलेली वाट दाखवेल तर कुणी एखादाच तुमच्यासाठी खास वाट तयार करेल..
त्या नदीच्या पलीकडे आहे बघा ते ठिकाण.. असे पत्ता सांगणारे बरेच मिळतील हो..
पण त्या होडीतून त्या पैलतीरी पोहचवणारा एखादाच असतो..
आयुष्यात खूप येवून गेले, आहेत आणि येतील ही वाटाडे..
जरूर विचार त्यांना रस्ता...
दाखवत असतील मार्ग तर जा त्याच्यासोबत...
पण एकदा त्याच्या हृदयाचा ठाव घे..
कारण वाट ही सुरु होते हृदयातून...
मग काय वाट काटाकुट्यातून जावो की फुला फुलातून..
मंजिल तर सुंदरच असेल..
वाहणाऱ्या नदीचा खळखळ आवाज..
कोकिळेची कुहू कुहू आणि डूबणारा सूर्य..
सगळं काही सुंदर..
झालं ना मनासारखं..
पण आत्ता त्या वाटाड्याला विसरू नका..
कारण
परतीची वाट त्यालाही धरायची असेलच..
पण तो परत जायच्या आधी त्याचा हात घट्ट धर आणि सांग..
"परतीची वाट एकत्रच सांधू..."
मंजिल महत्वाची नव्हतीच मुळी..
महत्वाचा होता तो प्रवास तुझ्या सोबतचा...
तू सोबत असशील तर आशा किती वाटा आणि किती मंजिली.. !!
************* समाप्त ***************
आपल्या आयुष्याची वाट तयार करणाऱ्या आपल्या आई, वडिल, शिक्षक... तीच वाट सुंदर बनवणाऱ्या पत्नी ला.. आणि त्याच प्रवासात थोडीशी भंकस करून मजा आणणाऱ्या मित्रांसाठी हे पद्य...!!

picture is just for illustration In case any copyright issue please inform us. |
Good...
ReplyDelete