.post img {

Pages

Sunday, 24 May 2020

Ship Of Theseus 2012 -National Award Winner

चित्रपट- शिप ऑफ थिसस 2012
कथा, दिग्दर्शन- आनंद गांधी
निर्माता- सोहम शाह, अमिता शाह, मुकेश शाह, किरण राव
अभिनय- एदा खाशेफ, नीरज काबी, सोहम शाह


राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांची यादी विकिपीडियावर चाळताना हा चित्रपट मिळाला. दुर्दैव हे की इतक्या सुंदर चित्रपटाचं मला नाव देखील माहीत नसावं. 

आत्म्याला हात घालून विचारांना गदागदा हलवून जाणिवा जागा करणारा हा चित्रपट. 'Ship of Theseus" हे जगातलं एक तत्वज्ञान आहे. एखाद्या गोष्टीचे भाग बदलून जर त्यास दुसरे अगदी सेम भाग जोडले तर त्या गोष्टीची ओळख बदलून जाते का? मग त्यातून सुरु होतो विचारांच्या विरोधाभासाचा (Philosophy Paradox) प्रवास. आपण ज्या विचारांसाठी जगतो तेच पूर्णत्वास नेण्यास त्याच्या विरुद्ध असलेल्या विचारांचा आधार घ्यावा लागतो. त्यात होणारी मनातली घालमेल जीवघेणी ठरते.

जीवनाच्या अंधारात, जिवंत क्षण शोधणारी अंध फोटोग्राफर, Lab animals वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारा जैन संन्याशी आणि किडनी चोरीला गेलेल्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यात प्रयत्नशील गुजराती ट्रेडर या तीन विभिन्न कथा एका सुंदर साखळीने मांडल्या आहेत. आनंद गांधी यांचे लेखन आणि दिग्दर्शन अगदी उच्चपातळीचं आहे... नीरज काबी, ऐडा काशीफ आणि सोहम शाह यांचा अभिनय सुन्न करून जातो. नीरज काबी यांचा सेक्रेड गेम्स मधला परुळकर चा रोल आणि या चित्रपटातला संन्यासी रोल जर मनात तुलना केली तर खरा अभिनेता दोन विरुद्ध स्वभावी पात्रं किती जीव ओतून आत्मसात करू शकतो हे अचंबित करतं.

अगदी निवांत होऊन या चित्रपटातला एकेक शब्द लक्ष देऊन ऐका. कारण प्रत्येक scene आयुष्याला काहीतरी तत्व देणाराच ठरतो.

दुर्दैवाने त्यासाठी अजून प्रेक्षकवर्ग मिळत नाहीये. पण असे प्रयोगशील चित्रपट जोपर्यंत आपण डोक्यावर घेत नाही, तोपर्यंत आपल्या डोक्यावर भंकस मसाला चित्रपट ओतले जातील.


No comments:

Post a Comment