.post img {

Pages

Monday 2 October 2017

सैराट (२०१६)... उत्तुंग वाटचाल गावाच्या मातीची...

हा रिव्ह्यू नाहीये.. हे आहे कौतुकएका मराठी रसिकाकडूनएका सैराट धावणाऱ्या सिने-कलाकृतीचे. आजकाल चित्रपटाचे यशहे कमावलेल्या बिझनेस मध्ये मोजले जाते. खूप सुंदर सुंदर चित्रपट तयार होऊन सुद्धा मराठी चित्रपटांचे यश बॉक्स ऑफिस च्या कमाई मध्ये होत नव्हते. कारण एक तर मराठी प्रेक्षक वर्ग मर्यादित आणि जर प्रायोगिक सिनेमा असेल तर होणारी गर्दी कमी. सैराट ने 50 करोड चा आकडा पार केला आणि मराठी सिनेमा ला नवी स्वप्ने पडू लागली आहेत. मराठी पाऊल असेच सैराट धावू लागेल यात शंकाच नाही.


  
तर आता सैराट कडे वळू. हा सिनेमा म्हणजे पाण्यामध्ये मारलेला दगड आहे. पाणी शहरातले असो वा गावातले तो दगड मारल्यावर मनामध्ये मस्त वलय उमटतात. ते वलय तुम्हाला हसवणाररडवणार आणि मस्ती देखील करणार. या सिनेमा ची स्टोरी जर तुम्ही एखाद्याकडून ऐकलीत तर तुम्ही म्हणाल "बसइतकंच आहे या पिच्चर मध्येएवढी का हवा झालीय याचीशाळा किंवा कॉलेज मधील लव्ह स्टोरी तर आता खूप पिच्चर मध्ये असते." पण एकदा तुम्ही "सैराट" पाहून आला कि बाहेर येईपर्यंत मन हसतेगुणगुणतेप्रेमात बुडते आणि सुन्न देखील होते. 

सैराट चे दिग्दर्शककथा आणि डायलॉग लिहिणारे आजचे सनसनाटी व्यक्तिमत्व नागराज मंजुळे हे सिनेमा वठवण्याचा खूप कठीण प्रयत्न करत नाहीत. तर ते त्या कलाकरांमधून अलगद नैसर्गिक अभिनय करून घेतात. त्यात कुठेही नाटकीपणा नसतोअवाढव्य सेट नसतोग्लॅमर नसते. असतो तो चटपटीत संवादनैसर्गिक अभिनयभन्नाट संगीत आणि मनाचा ठाव घेणारी कथा. आणि विशेष म्हणजे ते स्वतः एखादी लहान मोठी भूमिका करून एन्जॉय करतात.

सैराट चे हिरो हिरोईन,  रिंकू राजगुरू (आर्ची) आणि आकाश ठोसर (परशा) हे दोघेही नवखे असून पण मोठ्या रोम्यांटिक कलाकारांना जमणार नाही अशी केमिस्ट्री सादर केलीय. सिनेमा संपेपर्यंत अवखळ स्वभावातून त्यांच्यात येणारी maturity खूप सहज बदलत जाते. परशाच्या मित्रांची भूमिका एकदम झक्कास. पोराच्या "लव्ह सेटिंग" ची काळजी त्याच्यापेक्षा मित्राना जास्त असतेआणि त्यांचे प्रयत्न आपल्याला पोट धरून हसायला लावतात. मंजुळे नी या चित्रपटा मध्ये सहकालाकारांची कास्ट बर्यापैकी "फॅन्ड्री" मधूनच घेतली आहे आणि ते सर्व कलाकार दिग्दर्शकाच्या विश्वासाला न्याय देतात.

अजय-अतुल बद्दल काय बोलायचेहे दोघे मराठी संगीताला लाभलेले लखलखीत सूर आहेत. सैराट ची गाणी कधी मनाला नाचायला लावताततर कधी शांत डोलायला लावतात. गावरान शब्दात सांगायचे तर "याड" लावतात.

ह्या चित्रपटाच्या विषयाबद्दल बोलायचे तरहा खूपच संवेदनशील मुद्दा आहे. भलेही आज सर्वानी हा सिनेमा पाहून परशा आणि आर्ची ची वाहवा केलीय आणि शेवटी जे घडते त्याबद्दल दुःख व्यक्त केले असेल. पण खऱ्या आयुष्यात अशा लव्ह म्यॅरेज केलेल्या मुला मुलींना किती वाईट नजरेने पाहीले जाते. त्यांचे लग्न म्हणजे घराची इज्जत चा प्रश्न मानला जातो. मग त्यांची शोधाशोध केली जाते. सापडले तर ताटातूट केली जातेमारहाण केली जाते. जर त्यांनी कायद्याचा आधार घेतला तर वाळीत टाकले जाते. त्या दोन कुटुंबामध्ये सुद्धा भांडणे होतात. दुसरा दृष्टिकोन असा आहेमुलांच्या बाबतीत जर पाहिले तर खूप वेळा ते प्रेम म्हणण्यापेक्षावयात येताना असलेलं फक्त आकर्षण असतं. समजून पण न उमजणारं कोडं असतं. आयुष्यात काहीतरी बनून दाखवण्याआधी संसाराचा गाडा ओढावा लागतो मग जे प्रेम आधी मजा होते तेच बंधन वाटायला लागले. याला अपवाद असतीलनाही असे नाही. पण खूप थोडे.

तुम्ही म्हणाल कि एवढा एन्जॉय करायच्या सिनेमावर एवढी गंभीर चर्चा कशाला. पण मन सुन्न करणाऱ्या क्लायमॅक्स मधून नागराज मंजुळेंना समाजाला विचार करायला लावायचाय. आणि तो तुम्ही नक्की करा. मंजुळेंच्या चित्रपटाचा क्लायमॅक्स नेहमी वर्मी घाव आणि जखमेतून ही विचार देऊन जातो.

If a reader doesn't understand Marathi, Even then I Request U to watch "Sairat". It has English subtitles and Many Bollywood personalities have appreciated this movie.

टीप: हा लेख "सैराट" या मराठी चित्रपटावर आधारित असूनयावरील मते वैयक्तिक लेखकाची आहेत. वाचकास एखाद्या मुद्द्यावर हरकत असल्यास कृपया कमेंट मध्ये आपले मत मांडावे. धन्यवाद..!!



No comments:

Post a Comment