.post img {

Automatic Size

Sunday 14 May 2017

शंभूराजे... औरंगजेबाला जरब बसवणारा छावा...!!

तलवारीच्या पात्यासारखा तेज... तेवढीच शब्दांची मृदुलता असणारा राजा...

एकाचवेळी लढवय्या छावा आणि कवित्वाची झालर असणारा राजहंस...

हा राजहंस मात्र स्वकीयांना पटलाच नाही. सावत्र आई, हातचे मंत्री, इतिहासकार आणि आप्तेष्ट सगळ्यांनी त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्याचे कर्तुत्व बुजवण्याचा प्रयत्न च केला..

एव्हाना तुम्ही ओळखले असेल कि मी आपल्या लाडक्या संभाजी राज्यांच्या बद्दल बोलतोय..


छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी लहानगे असल्यापासून स्वराज्य उभा करून मोगालासारख्या जुलुमी शत्रूला रोखून धरले. ते पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी एक एक मावळा जोडून भक्कम पाया उभा केला. छत्रपतींना जाणीव होती कि राज्य कितीही अभेद्य असले तरी उत्तराधिकारी जितका पाय रोवून उभा राहील, तितके ते टिकेल आणि वाढेल सुद्धा. म्हणूनच त्यांनी आणि जिजाऊ नी छावा घडवला. 

शिवाजी राज्यांच्या निर्वाणानंतर औरंगजेब ख़ुशी ने पागल झाला.. पूर्ण दिल्लीभर त्याने मिठाई वाटली... कारण दख्खन चा सिंह आता राज्याची राखण करायला हाजीर नव्हता.. त्याच्या माहितीप्रमाणे शिवपुत्र संभाजी सैरभैर होता.. ऐय्याश होता.. त्याला हरवणे म्हणजे काही दिवसांचे काम होते. आता त्याचे खऱ्या अर्थाने पूर्ण हिंदुस्तान चा बादशाह होण्याचे उरी रूतणारे स्वप्न पूर्ण होणार होते. ह्या आनंदाच्या कर्तबगारी साठी तो स्वतः जातीने दीड लाखांची फौज घेऊन उतरला. घोडदळ, हत्तीदळ आणि दुष्मनाला धडकी भरवणारे अमानुष सरदार सगळ काही त्याच्या बाजूने होतं. 

पण तुम्हाला माहित आहे का. औरंगजेब २५ वर्षे या महाराष्ट्राच्या मातीला मोगल अधिपत्याखाली घेण्यास झटत होता. त्यामध्ये त्याचे भले भले सरदार आणि लाखोंचे सैन्य खर्ची पडले. आणि याच मातीत बादशहाला मौत स्वीकारावी लागली. आणि मराठी मातीनेच त्याच्या देहाला आपल्यात सामील करून घेतले.

का नाही जिंकू शकला औरंगजेब या सह्याद्रीला? 

कारण एकच होते...

पहिली आठ वर्षे शिवबाचा छावा त्याच्यासमोर ठाकला होता. आणि शिवाच्या छाव्याने हे राज्य पडू दिले नाही. त्याच्यासाठी हि माती म्हणजे जिजाऊ चे संस्कार होते. ही माती म्हणजे वाघाच्या छातीचे गड किल्ले होते. आणि ही माती म्हणजे एक एक भोळा भाबडा मावळा होती. आणि त्यांचे जीवनच काय तर मृत्युनेही संताजी घोरपडे, धनाजी जाधव यासारख्या शिलेदारांना लढण्याची ज्योत दिली. एकाच वेळी १३ आघाड्यांवर नेतृत्व करून, दिवसाचे २०-२० तास हाती तलवार घेऊन ८ वर्षे मोगल लष्कराला सळो की पळो करून सोडले. औरंगजेबाची अवस्था तडफडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे झाली. आणि जोपर्यंत 'संभा' ला कामयाबिच्या रस्त्यातून बाजूला करत नाही तोपर्यंत राजमुकुट परिधान करणार नाही हि शपथ घेतली. 

मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितूर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के काही गावांच्या वतनांसाठी शत्रूला सामील झाले.

संभाजी राज्यांवर किती कट कारस्थाने झाली, मृत्यू किती दाहक होता हे आपण वाचले आणि ऐकले असेलच. पण आज (१४ मे) त्यांच्या ३६० व्या जयंती च्या दिवशी त्यांचे असणेच आठवूया.

आठवूया ते आईविना छोटेसे पोर..
आठवूया तो जिजाऊ चा लाडका शंभू..
आठवूया आग्र्याच्या काळकैदेला निडर होऊन आपल्या पित्यासह पार करणारा "शेर का बच्चा".
आठवूया मराठी राज्याचा अवखळ युवराज..
आठवूया अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवून शब्दनाही भुरळ पडणारा अवलिया..
आठवूया त्या पराक्रमी राज्याला...

|| मतं मी श्री शिवराजपुत्रस्य श्री शंभूराज  ||

टीप: संभाजी राज्यांच्या विषयी "छावा- शिवाजी सावंत" आणि "संभाजी- विश्वास पाटील" या कादंबर्यांनी मला शंभूराज्यांची ओळख करून दिली त्याबद्दल लेखकांचा मी ऋणी आहे.










No comments:

Post a Comment