.post img {

Automatic Size

Saturday, 18 May 2019

थोरांच्या जयंतीचे विद्रुप सेलिब्रेशन -एक कटू सत्य

काल बऱ्याच ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या रॅली पाहायला मिळाल्या. फक्त आणि फक्त शांतीचा संदेश देणाऱ्या या थोर महात्म्याच्या मूर्तीस डॉल्बीच्या थराशेजारी विराजमान करून नव नवीन अशांततापूर्ण आयटम songs त्यांच्या कानाशी किंचाळत होते. बुद्धांचे अनुयायी म्हणवून घेणारे लोक त्याच गाण्यांवर अचकट विचकट नाचत होते.

हे फक्त कालचंच नाही, तर पिढ्यानपिढ्या आपण हेच करतोय. आंबेडकर जयंती, शिव जयंती, गणेशोत्सव आणि अजून बऱ्याच थोरांच्या जयंत्या किंवा उत्सव आपण याच भन्नाट style मध्ये साजऱ्या करतो. जयंतीपेक्षाही ते राजकीय शक्तिप्रदर्शनसारखे वाटते. ज्या माणसाची जयंती आपण साजरी करतो, त्या माणसाने आयुष्यभर डोकं फोडून काहीतरी छानशी आणि वेगळीच शिकवण दिलेली असते. मग ही जयंती म्हणजे त्या व्यक्तीची आणि देवतेची विटंबना आहे,असे मला वाटते.

डॉल्बीवर नाचायचेच असेल तर लग्नात किंवा पब मध्ये जाऊन बिनधास्त नाचावे पण त्या महान व्यक्तीचा अपमान करण्याचा अधिकार कुठल्याही अनुयायाला नाही. व्यक्तीची शिकवणूक पालन करता येत नसेल तर मग न साजरी करता शांत बसावे.
गौतम बुद्ध म्हणजे या भारतदेशाचा असा पुत्र आहे की त्याची शिकवण जास्तीत जास्त दुसऱ्या देशातल्या लोकांनी आचरणात आणून शुद्ध स्वरूपात जतन करून ठेवली. पंचशीलपालन आणि विपश्यना ध्यानधारणा (Meditation) ही त्यांनी जगाला दिलेली भेट. प्रत्येक माणूस जर पिंडी शांत असेल तर ब्रह्मांडी शांतता लाभायला वेळ लागणार नाही.

लोकांना वाटेल की काय हा माणूस  पुस्तकी गोष्टी सांगत बसलाय. जग बदलणार आहे का याच्या अशा लिहीण्याने. पण मला वाटते की एक माणूस बदलला तरी माझ्यासाठी जग बदलल्यासारखं आहे. जोपर्यंत बघे बघत राहणार तोपर्यंत ती न आवडणारी गोष्ट करत राहणार.
गौतम बुद्धांना मनःपूर्वक प्रणाम..!!

टीप- हा लेख कुठल्याही एका समाजाविषयी नाही तर एका प्रवृत्ती विरुद्ध आहे की जी प्रत्येक जातीधर्मात आहे. माझ्या या व्यक्तिगत मतास कुणाचा काही आक्षेप वा अभिप्राय असेल तर जरूर कमेंट करा.

5 comments:

  1. खरंय विशाल , आपण त्यांची शिकवण आचरणात आणण्या ऐवजी असले विद्रुपीकरण करतो शातंता तर भंग होतेच पण तू सांगितलसांगितल्या प्रमाणे शक्तीप्रदर्शन दिसते. थोर मोठ्याचा असा अनादर करून त्यांच्या जयंत्यया साजर्या करू नये .

    ReplyDelete
  2. खरे आहे.
    महापुरुषांचे विचार आचरणात आणा.
    तेच खूप आहे.पण इथे सगळे बाकीच्या गोष्टींना प्राधान्य देतात.

    ReplyDelete
  3. तुमच लिखाण असामान्य आहे तुमी वास्तव परस्थिती वर भाष्या केलं आहे

    ReplyDelete
  4. Unknown27 January 2020 at 02:01
    आनंद खरात, तुमच लिखाण असामान्य आहे तुमी वास्तव परस्थिती वर भाष्या केलं आहे

    Reply

    ReplyDelete