#विशालाक्षर
#विशालाक्षर_अध्यात्म
श्री भगवानूवाच..
तू बोलायला लागलास ना रे..
तेव्हा तुझ्या एकेक शब्दांत बांधली जाते गीता..
माझे संभ्रम ढळत जातात,
रथाच्या चक्राखाली..
आणि त्यातून शहाणपण येते झळाळून ,
थेट अगदी त्याच रथाच्या ध्वजापर्यंत..
गर्भापासून स्मशानापर्यंत,
इतकीच काय ती रणभूमी..
आपले किंवा परके नाही रे आता,
इथे मीच माझ्या समोर आहे..
जाणिवेतली महत्वाकांक्षी शंभर इंद्रिये,
आणि नेणिवेतला अंध मोह..
सगळे एकमेकांचेच सख्खे साक्षी..
असे हा अपेक्षांचा संजय सांगत आहे..
कृष्णा...
तू किती अवतार घेणार,
किती रे तू दमछाक करणार..
कमरेवर हात ठेवून,
डोळे मिटून,
मंद स्मित करत उभा रहा..
तू दिलेल्या गीतेने,
मी करेन बघ सारथ्य माझे,
तुझ्यात एक होण्यास..
तुझ्या दिशेने..
©विशाल पोतदार
No comments:
Post a Comment