#विशालाक्षर
#पावसाची_मिठी
पाऊस कोसळताना
प्रत्येक थेंबाला मिठी मारायची असते
घट्ट..
त्यावेळी नाही करायचा
दुष्काळाचा विचार..
किंवा तो नसतानाचे
रखरखीत उन्ह...
की भीती वाटते तुला,
सवयीचा झालेला तो निघून गेल्यावर
तुझं रिकामेपण उरेल याची?
त्याचं आणि तुझं नातं,
ऋतूपुरते नसते..
बाकीच्या आठ महिन्यात,
वाहणाऱ्या नदीत तो असतो,
समुद्राच्या धुंद लाटांत असतो..
त्याच्या जागा भरल्या तरी
एक ढग
फक्त तुझ्यासाठी असतो..
पुन्हा तुझ्याकडे येण्याच्या तयारीत
जस्साच्या तसा..
आठ महिन्यांच्या विरहासाठी
त्याचा ऋतू टाकू नको
तुझा ढग
त्याचे थेंब
मनातल्या तळ्यात भरून
साजरे कर,
तहानलेले,
लाखो दुष्काळ..
©विशाल पोतदार
No comments:
Post a Comment