.post img {

Automatic Size

Wednesday 10 May 2017

नाती गोती.... मनाला मनाशी जोडणारा सांधा...

का कुणास ठाऊक पण नाती जुळतात..

मागच्या जन्मीचे देणं जणू ते या जन्मी देऊन जातात..
जन्मल्या जन्मल्या च काही छान छान माणसे आपली काळजी घेतात.. रांगत्या जीवाला प्रेमाने घास भरवतात.. ज्यांच्यासाठी देव सुध्दा झुरतो असे ते आई वडिलांचं नातं आपसूकच मिळते..

चालायला लागलो की आपल्या मनालाही पाय फुटतात. आणि मित्र नावाचे नमुने आपल्या जीवनात येतात. हे अतिशहाने लोक आपली दुनियाच बनतात. आपल्या मनाला जे पाय फुटलेले असतात त्याला ते पंख देतात. मग मनाचा पंछी जसे आभाळ मिळेलं तसे बागडू लागते.

उडता उडता एखादे छानसे फुलपाखरू भेटते.. जीला पाहून हा दिल आवारा पागल दीवाना होऊन आवरता आवरत नाही. आणि आयुष्यात प्रेमाचे नाते भेटते.. ते जर क्षणभंगुर ठरले तर पुढे छानसा आयुष्याचा जोडीदार भेटेल.. आणि त्या जोडीदारामध्ये पण आपल्याला मित्र.. प्रेयसी दिसू लागेल..

A photo is just for representation. Photo rights not owned by vishalwords

खूप नाती गोती.. काही आनंद देणारी तर काही गोत्यात आणणारी...

आपोआप मिळाली म्हणून आपण बंधन समजता का नात्यांना?
गोंडस नाव देतो आपण.. बंध रेशमाचे.. मायेचे.. मैत्रीचे..
पण नाते नसते ना हो हे बंधन.

नात्यामध्ये मनाच्या ओलाव्याची पर्णकुटी बांधा. संवादाच्या झाडपाल्याने.. पण आजकाल आपण बांधल्यात दगडाच्या भिंती. संवाद हा फक्त निर्णय , टीका, द्वेष ऐकवन्यासाठी वापरला जातो आणि एखाद्या वाईट परिस्थितीचा हादरा आला की त्या दगडाच्या भिंतीखाली नाते मरून जाते.. पुन्हा तेच दगड वापरले जातात सवती घरे वसवण्यात..

पर्णकुटी कितीही मोठा हादरा आला तरी तुमचे नातं जिवंत ठेवेल. पण वादळवाऱ्यात तिलाही तुम्हाला जपायला हवं.. एक खांब धरून तुम्हालाही उभा राहायला हवं.. संवादाचा तोल नका जाऊ देऊ.. तेव्हाच तुमची पर्णकुटी.. तुमचं नातं टिकेल..

ती नात्यातली आर्तता हरवतेय का थोडीसी? थोडी फेसबुक थोडी व्हाट्सएपच्या च्या दुनियेत. एका सेकंदात हजारो लोकांशी संपर्क साधता येतोय. पण आज्जी कडे मोबाईल नाही म्हणून आपण 2-2 महिने नाही ना बोलू शकत? वाटले सगळे जवळ येतील. Global Village होईल. पण सगळं लांबच जातंय. उलट्या पकडलेल्या भिंगासारखं..

शबरी ची उष्टी बोरं आठवतात ना. लक्ष्मणाला राग आला की ही थेरडी माझ्या रामाला उष्टी बोरं देतेय.. पण रामाला च त्या बंधना पलीकडील नात्याची जाणीव होती.. आपल्या नात्याला योग्य ते मिळायचा खटाटोप.. एवढाच हेतू..
खूप मोठा अर्थ सांगून गेली ती नात्याचा.. प्रेमाचा आणि भक्तीचा..

मान्य आहे टीका करणे सोपे आहे.. मी सुद्धा त्यातलाच... पण प्रयत्न करा की प्रत्येक सुट्टी दिवशी एका तरी मित्राला, मैत्रिणीला.. नातेवाईकाला फोन करायचा..
better प्रत्यक्ष भेटायचे..

प्रॉब्लेम हा आहे की दोघेही म्हणतात तू मला विसरलास...technology विसरायला लावतेय..option इतके झालेत की फुलपाखरू प्रेम टिकवण्यापेक्षा breakup जास्त करायला लागलेय..

पहिले पाऊल तुम्ही उचला..

कुटुंब.. मित्र मैत्रिणी.. नातेवाईक... पुन्हा एकदा संवाद साधा.. आणि नाती सांधा...
कराल ना??

No comments:

Post a Comment