.post img {

Automatic Size

Sunday 14 January 2018

मकरसंक्रांती... हितचिंतक बना.. फक्त तोंडावर (?) गोड बोलू नका..

संक्रांती चा आपण लहानपणापासून बोलत आलेले घोषवाक्य...
"तिळगुळ घ्या ..गोड गोड बोला.."

पण आता काळानुसार ह्या घोषवाक्यामध्ये काही बदल करूया का? हो म्हणजे आजकाल आपण परंपरेमध्ये बरेचशे बदल करतोच. अगदी ऑनलाइन शुभेच्छा, ऑनलाईन पूजा, बाळाचे बारसं व्हिडिओ कॉल वरून करणारी आत्या इत्यादी इत्यादी घडतंय. बदल होतात माणसाच्या सोयीनुसार किंवा priority नुसार.. 

असो..

आपण तिळगुळाचे लालच देऊन दुसऱ्याला गोड बोलायला सांगतो. पण स्वतःच्या बोलण्याची आम्ही ग्यारंटी नाही घेऊ शकत. म्हणजे तुम्ही गोड बोलता की नाही यावर आमची reaction अवलंबून असते. आपल्या गावरान भाषेत सांगायचं मजी, ह्ये बगा तिळगुळ दिउन माज्याशी तू गॉड बोललंच पायजे अशी कशाला दमदाटी करायची. आपण तिळगुळ देऊन आपणच गॉड बोलायची शपथ घेऊया की. आपण असंच म्हणतो, अरे त्याला जर बोलायला पुढाकार घ्यायचा नसेल तर मी का जाऊ शेपूट हलवत त्येच्यासमोर. पण मित्रा समोरचा पण असच म्हणत असतो, आणि बरीच नाती फक्त व्हाट्सअप्प वर शुभेच्छा फॉरवर्ड करण्यापूरती राहतात.

यावेळी अजून एक ठरवायचं. ते म्हणजे, टी व्ही सिरीयल मधल्या सासू सुनेसारखं तोंडावर गोड आणि पाठीमागे काटा काढायच्या गोष्टी नको. गोड बोलणाऱ्या पेक्षा हितचिंतक कधीही चांगला. नुसतं खोटं गोडवा गाणाऱ्या मित्रांपेक्षा, कटू सत्य सांगणारा शत्रू परवडला. अगदीच कटू नाही पण आपल्याला स्पष्ट पणे त्या व्यक्तीच्या हिताच्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. नुसते तीळ खाल्ले तर थोडे कडवट लागतात, पण गूळ त्याला सामावून घेतो. (आपण वाटतो ते साखरेचे गोळे असतात, तिळगुळ नाही.. :D).

हिंदू संस्कृतीतील सणवार सामान्यतः चंद्राच्या स्थानावर अवलंबून असतात म्हणून इंग्रजी दिनदर्शिकेत दरवर्षी तो सण वेगवेगळ्या तारखेला येतो, पण मकर संक्रांती ही सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाचे प्रतीक असते. म्हणूनच तो इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे 14 किंवा 15 जानेवारीमध्ये फिक्स येतो. म्हणजे हा सण एका बदलाचा किंवा नव्या विचाराचा सण आहे.

सूर्याचं उत्तरायण आजपासून सुरू होईल व त्याचा स्वभाव आता हळूहळू तापट पण होत जाईल. त्याच्याच बदलाची चाहूल म्हणजे मकरसंक्रांती. आपले पूर्वज प्रत्येक गोष्टींचा सर्वासार विचार करून परंपरा ठरवत होते. आपण त्यातल्या गोष्टी नक्कीच सोडायच्या नाहीत, पण विचार करून काही नवीन गोष्टी जोडू.
तुम्हास मकारसंक्रान्ती च्या खूप खूप शुभेच्छा... मी तुमचा सदैव हितचिंतक बनून राहीन...





No comments:

Post a Comment