.post img {

Automatic Size

Wednesday 29 April 2020

इरफान खान - Coolest Guy in the Room

#RIPIrfan
इरफान

मित्रांच्या घोळक्यात, नातेवाईकांच्या गोतावळ्यात किंवा ऑफिस ग्रुप मध्ये असा एखादा माणूस असतो जो सोबत असला की वाटते, 'हा आहे म्हणजे सगळं मस्त होणार'. चित्रपटांच्या घोळक्यात माझ्यासाठी हा माणूस म्हणजे इरफान खान. Coolest guy in the room. हा स्क्रीनवर असेल तर उत्तम script सोडा, पण समोर बातम्या जरी वाचणार असेल तरी interseting असतील हा असा आत्मविश्वास वाटतो. स्क्रीन वरच्या सहज वावरामुळं  चित्रपटात आपण एक काल्पनिक गोष्ट पाहतोय हे विसरून जायला होतं..
यह साली जिंदगी सारखा entertainer, मकबूल सारखा classic किंवा लंचबॉक्स सारखा experiment.. याचा जॉनर फिक्स नव्हता.. याचा जॉनर फक्त 'अभिनय' हाच होता..

इरफानचे डोळे मोठे आणि आवाज खर्जातला असला तरी त्याच्या character मध्ये रागिटपणा कधी भासला नाही. पण ज्या रोल मध्ये गरज होती (पानसिंग तोमर, मदारी, तलवार अशा चित्रपटात) तिथे राग अलगद उतरायचा. तरी तो राग व्यक्तिमत्वाच्या जीवनातील वैताग, ताण, दुःख, विषण्णता असा एखादा पैलू वाटायचा. लंचबॉक्स मधला पत्नी गमावलेला, रिटायरमेंटच्या जवळ असणारा साजन फर्नांडीस पाहताना, त्याच्या डोळ्यातील हरवलेपण, एकटेपण अगदी हृदयाला भिडून जातं. 


उगीच ओढून ताणून काहीतरी करायचं म्हणून याने कधी केले नाही. माझ्या मते त्याच्या success चं कारण हेही असावं की, त्या पात्रांपेक्षा मोठं होऊन त्याने काम केले नाही. त्यावेळी त्याची प्रतिष्ठा, आणि अभिनयाची लेव्हल त्या पात्राईतकीच असते. कमी नाही जास्त नाही. त्यामुळेच कदाचित त्याच्या जबरदस्त प्रेझेन्स मुळे बाकीच्या पात्रांची value कधी कमी होत नाही. 

Hollywood मध्ये मॉर्गन फ्रीमॅन यांनी नायकाच्या तोडीचा सहाय्यक कलाकार असण्याचा काळ सुरू केला. तोच रोल इरफानने बॉलीवूड मध्ये निभावला. तसेच हँडसम, सिक्स पॅक, डान्सर या 'बॉलीवूड हिरो' नियमावलीत न बसणारा अभिनेतादेखील नायक बनून प्रेक्षकांना खेचून शकतो हे सिद्ध केलं. यामुळेच कदाचित नवाजुद्दीन, राजकुमार राव, विकी कौशल यासारख्या उत्तम अभिनेत्यांचे मेन रोलसाठी मार्ग सुसह्य झाले असावेत. 

आज तो गेला... त्यामुळे बोलावं तितकं थोडंच आहे.. पण इरफानने चित्रपट 'चमक धमक' पेक्षा ' उत्तम अभिनय' या गोष्टीनेसुद्धा चालू शकतो हे दाखवून दिले. म्हणूनच त्याने 'हिंदी मिडीयम' चित्रपटांची सीमा उल्लंघून 'इंग्लिश मिडीयम' (हॉलीवूड) मध्ये आपले नाव गाजवले. 

त्याच्याकडून चित्रपटसृष्टीला अजून खूप काही मिळालं असतं हे सत्य असलं तरी आता ते शक्य नाही. आपलं दुर्भाग्य. पण आपलं भाग्य हेच की त्याने आजपर्यंत जितकं काही मांडून ठेवलंय ते पुन्हा पुन्हा पाहू शकतो. त्याच्या अभिनयातल्या miss झालेले पैलू पुन्हा एकदा शोधून काढू. 

श्रद्धांजली..💐💐
God can enjoy your show now..!!







No comments:

Post a Comment