.post img {

Monday, 2 October 2017

कट्यार काळजात घुसली (२०१६)...अभूतपूर्व स्वरांची मैफिल...!!

"सूर निरागस हे ..."

 या पेशकशीने चित्रपटाची सुरुवात होते " आणि तेच स्वर गुणगुणत तुम्ही थिएटर मधून बाहेर पडता. काळजामध्ये सुरांची कट्यार घुसलेली असते आणि तुम्हाला ती अजून रुतत जावी असेच वाटते.

सुबोध भावे यांचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न. पण हा चित्रपटएखाद्या मुरलेल्या दिग्दर्शकाच्या भट्टीतून तयार झालेल्या कलाकृतीच्या तोडीचा वाटतो. हा चित्रपट म्हणजे आपल्या आधीच्या पिढीची अमूल्य ठेव पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा प्रयत्न आहे.

पुरुषोत्तम धार्वेकर लिखित 1967 मधील मूळ "कट्यार.." हे नाटकप. जितेंद्र अभिषेकी यांनी "पंडित भानुदास शास्त्री" यांच्या भूमिकेत आणि वसंतराव देशपांडे यांनी "खांसाहेब" यांच्या भूमिकेत गाजवले. तो ठेवाआजिबात मोडतोड न करता आणि एकदम ताजातवाना करून आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आपल्या पिढीला संगीत नाटक जवळून पाहता आले नाही. पण या चित्रपटामुळे ते अनुभवायला मिळाले त्याबद्दल "कट्यार.." च्या टीम चे आभार मानायला हवेत.


चित्रपटाची स्टोरी सांगणार नाही मी.. पण खालील वाक्य चित्रपटाचा पाया सांगून जाते...
"कलाकाराला दोन गोष्टींचा शाप असतो.. "तुलना" आणि "अहंकार".

पार्श्वगायन आणि संगीताचा अतुल्य पर्वत शंकर महादेवन जीराहुल देशपांडे आणि महेश काळे यांनी पेलला आहे. "घेई छंद..मकरंद" , "तेजोनिधी..", "दिल कि तपिश.." या गाण्यांमधील हरकती अंगावर रोमांच उभा करून जातात. तुमची नजर आणि कान धुंद होऊन जातात. सिनेमासाठी आवश्यक नव्या संगीतरचना करताना शंकर-एहसान-लॉय हे त्रिकुट जुन्या पदांना धक्का लावत नाही. पदांची रचना करण्यासह दोन भिन्न घराण्यांचं संगीत देणं हे प्रतिभाच करू शकते. हे यातून पुन्हा सिद्ध होतं. म्हणूनच सिनेमा पाहात असलो तरी इथेही संगीत हाच याचा आत्मा ठरतो. मराठी प्रेक्षकांमध्ये असे खूप कमी लोक आहेत की जे शास्त्रीय संगीत ऐकतात किंवा त्यातली जादू अनुभवतात. पण ह्या चित्रपटातील स्वरलोकांना नक्कीच शास्त्रीय संगीताच्या प्रेमात पाडेल.

तसे पाहिले तर या गाण्याच्या तारांगणातअभिनयाचे एक अढळ सप्तर्षी बनवून ते आणखीनच सुंदर केले आहे. सचिनजी पिळगावकरशंकर महादेवन जीसुबोध भावेअमृता खानविलकरमृण्मयी देशपांडेपुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर हे सर्व कलाकार या चित्रपटाचे सप्तर्षी आहे. सर्व कलाकारांनी आपली पात्रे आपल्या जागेवर अढळ केली आहेत.

सचिनजींच्या 50 वर्षाच्या कार्यकाळातील एक मैलाचा दगड म्हणून "खांसाहेंब" हि भूमिका ओळखली जाईल. खरे तर त्यांचा चेहरा आणि स्वभाव एक अत्यंत निरागस आणि मृदू प्रकारचा. पण खांसाहेंब हि भूमिका अत्यंत करारीकडकअभिमानीराजगायक पदावर बसण्यासाठी काहीही करण्यासाठी निगेटिव्ह छटा असलेली आहे. पण आपल्या समोर त्या भूमिकेत निरागस सचिन. त्यांनी त्या भूमिकेसाठी स्वतः चे समर्पण करून एक खांसाहेबाना शोभेल असा एक नवाच नट उभा केला आहे. कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही कि हे सचिन पिळगावकर आहेत. सचिनजी नी एका मुलाखती मध्ये सांगितल्याप्रमाणेपन्नास वर्षात हा त्यांच्यासाठी असा पहिलाच मराठी चित्रपट आहेज्यामध्ये त्यांनी निगेटिव्ह छटा साकारली आहे आणि तेही एक हि मराठी शब्द न वापरता.


शंकर महादेवन यांनी सुरेल अभिनय करून आपल्या अभिनयाचा पहिलाच अंक यशस्वी केला आहे. सुबोध भावे हा कलाकार एक आगळ्या वेगळ्या भूमिकेसाठी भुकेलेला नायक आहे. या आधी बालगंधर्वलोकमान्य टिळक यासारख्या भूमिकांमधून आपले ऐतिहासिक महानायकरासिकांसाठी जिवंत केले आहेत. तीच अभिनयाची तीव्रता त्यांच्या "कट्यार...." च्या सदाशिव च्या भूमिकेत दिसते. अमृता खानविलकर आणि मृण्मयी देशपांडे या दोघी "झरीना" आणि "उमा" या पात्रात खूप सुंदर दिसतात. आणि हिंदी मालिकांमधील लाडकी सून साक्षी तन्वर या खांसाहेबांच्या बेगम ची भूमिका छोटी असली तरी एक लक्षात राहणारी साकारली आहे.

मूळ नाटकात खांसाहेंब आणि पंडित जी यांची भूमिका सादर करणारे श्रेष्ठ गायक स्वतः होते. पण चित्रपटामध्ये पार्शवगायन असल्यामुळे शास्त्रीय संगीत गायनाचा अभिनय करण्याचे एक खूप मोठं आव्हान होते. तो आवेश.. तो फंकार.. सुरानुसार बदलणारी डोळ्यातील चलबिचलया गोष्टी सचिन आणि सुबोध भावे यांनी अतिशय उत्कटतेने जगल्या आहेत. कुणीही म्हणणार नाही कि ते पार्श्वगायन केलेल्या पेशकशी आहेत.

माझ्या मते पूर्ण भारता मध्ये असा Musical चित्रपट आजपर्यंत झाला नाही आणि भविष्यात झालाच तर रसिक खूप भाग्यवान असतील.

तुम्हाला शास्त्रीय संगीत आवडत नसेल तरीही पाहायला जा आणि अनुभवा ते सूर. आणि जे सच्चे संगीतप्रेमी असतील तर एक एक पदं ऐकताना तुमचे डोळे ओलावले नाहीत तर तुमचे मन तिथे नव्हतंच असे समजा.

कट्यारीचे मनोगत ज्या अभिनेत्री च्या आवाजात आहे ते पण एक surprise आहे.

Note: If you are non-Marathi n just have scrolled down this article. Please note this movie has Subtitles. And greatest ever Music. So please watch "Katyar Kaljat Ghusli" "Dagger through Heart".

जर या लेखनात काही चुका असतील तर माफ करावे आणि कृपया दर्शवून द्याव्यात.
No comments:

Post a comment