.post img {

Automatic Size

Monday 2 October 2017

"नटसम्राट (२०१६)" - असा नट होणे नाही...

चित्रपट संपला तरी थियेटर सुन्न झालेले असते.... प्रेक्षक खुर्ची ला खिळून बसलेले असतात ... नावे पडत असतानाच नानांच्या आवाजात शेवटचा  संवाद  चालू असतो.... डोळ्यांच्या कडा एका अभूतपूर्व अभिनयाच्या साक्षात्काराने ओलावलेल्या असतात... जेव्हा नावे संपून पडदा पूर्ण मोकळा होतो त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट होतो आणि मगच प्रेक्षक जागेवरून उठतात. नटसम्राट आपल्या हृदयामध्ये घेऊनच बाहेर पडतात.
 माझ्या मते चित्रपटगृहात असा नजारा... असा आदर... निर्माण करणे,आजपर्यंत खूपच थोड्या चित्रपटानी साध्य केलेय.  हाच खरा चित्रपटज्या मध्ये किती कमाई केली यापेक्षा किती मनाचा ठाव घेतला या मध्ये याचे यश मोजले जाईल.. "नटसम्राट" ने मराठीच नव्हेतर देशाच्या चित्रपट सृष्टीचा गौरव केला आहे.

प्रथमसाष्टांग नमस्कार कुसुमाग्रजांना (मूळ नाटकाचे लेखक)डॉ. श्रीराम लागू ना (मूळ नाटकाचे नटसम्राट)ज्यांनी गणपतराव आपल्यापुढे जिवंत केले. नव्या पिढीला ते नाटक जवळून पाहण्याचे भाग्य लाभले नाही. पण महेश मांजरेकर (दिग्दर्शक) आणि नाना पाटेकर (मुख्य भूमिका) यांनी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर उभारण्याचे उपकार केले. नाटक आणि सिनेमा यांत तुलना होऊच शकत नाही आणि ती करण्याचा कुणी प्रयत्न हि करू नये. कारण दोन्ही माध्यम आपल्या ठिकाणी सम्राट आहेत.

चित्रपटाची कथाप्रसिध्द नट गणपतराव बेलवलकर (नाना पाटेकर)पत्नी कावेरी (मेधा मांजरेकर),  त्यांची मुले आणि गणपतरावांचा जिवलग मित्र राम (विक्रम गोखले) यांच्या आयुष्याभोवती फिरते. आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर "नटसम्राट" हि मानाची पदवी मिळाल्या नंतर गणपतराव निवृत्ती घेतात.आयुष्यभर रंगभूमीच्या सागरात मनसोक्त डुंबनारा हा राजहंसनिवृत्तीनंतर खऱ्या व्यवहारी जगात येतो. पण त्यांची खऱ्या आयुष्यातील निस्वार्थीस्पष्टविनोदी व वेळप्रसंगी तिरके बोलणारी बालिश भूमिका त्यांच्या मुलांना खालच्या दर्जाची वाटू लागते. त्यांना भक्कम साथ असते ती म्हणजे त्यांची पत्नी "कावेरी" ची. कलाकार हा जणू पणती असते व त्याचा जोडीदार हा त्या पणती ची मिणमिणती ज्योत असते. ती स्वतः जळत असते पण त्या पणतीला व घराला प्रकाशमान करत असते. पण दुर्दैवानेसगळा मान पणती ला मिळतो व ज्योत विझल्यावरच तिच्या अस्तित्वाची जाणीव होते व कमी भासते. काही दिवसातच गणपतराव व कावेरी अगदी घरालाही पारखे होतातकावेरी बाईंचा मृत्यू होतो व आप्पासाहेब एकटे पडतात.

नाना पाटेकर यांच्या विषयी काय बोलावे? 'प्रहार', 'यशवंत', 'तिरंगा', 'क्रांतिवीरयातले त्यांचे डायलॉग अजून आमच्या तोंडपाठ आहेत. नाना हेच खऱ्या अर्थाने अप्पासाहेब या भूमिकेसाठी योग्य अभिनेते आहेत. खऱ्या अर्थाने आमचे नटसम्राट आहेत. मेधाजी नी आपल्या पतीविषयी वाटणारे "कावेरी" चे प्रेम व काळजी जिवंत केली आहे. मेधा मांजरेकर ह्या मराठी चित्रपट सृष्टीला थोड्याश्या उशिरा लाभलेल्या अप्रतिम चरित्र अभिनेत्री आहेत.त्यांच्याकडून अश्याच दमदार भूमिका पाहायला मिळोत ही अपेक्षा.

माझ्यासारख्या खूप साऱ्या रसिकांची इच्छा असेलती म्हणजे नाना पाटेकर व विक्रम गोखले यांना एकत्र काम करताना पाहण्याची. ती इच्छा "नटसम्राट" ने पूर्ण करून दिली ती ही अगदी तृप्तपणे. राम "विक्रम गोखले" मृत्युशय्येवर असतानागणपतरावांशी जो कर्ण व कृष्णाचा संवादाचा नाटकाचा प्रवेश सादर करतात तो "अवर्णनीय". मृण्मयी देशपांडेनेहा पेंडसेसुनील बर्वे यांचा अभिनय हि लोभसवाणा आहे.

चित्रपट अतिशय उत्तम प्रकारे हाताळला आहे. नाटकाच्या स्क्रिप्ट मध्ये योग्य ते थोडेफार बदल केलेले आहेत. पण मूळ संवाद अतिशय ताकदीने सादर केले आहेत. जळालेल्या नाट्यगृहात जेव्हा वृध्द गणपतराव बेलवलकर प्रवेश करतात त्यावेळचा क्षणनानांचा अभिनय अद्वितीय आहे. कलाकार आपले आयुष्य व त्याचे सर्वस्व कलेसाठी आणि रसिकांसाठी वेचतो. अर्थात त्याबद्दल कलाकाराला प्रसिद्धीमान मरातब आणि पैसा हे मिळतेच. पण जेव्हा तो कलाकार निवृत्त होतो त्यावेळी त्याला समजून घ्यायला कुणी नसतेअगदी त्याचे कुटुंबीय सुद्धा त्याला समजू शकत नाहीत. 

या कथेमध्ये अजून एक भाग आहेतो म्हणजेजेव्हा निवृत्ती नंतर आई वडिलांचीमुलांकडून होणारी उपेक्षा. दोन पिढ्यातील अंतर वयामध्ये असतेपण जेव्हा मनातील अंतर वाढत जाते तेव्हा नाती रुक्ष होतात. आपण तरुण पिढी एक गोष्ट विसरतो, "म्हातारपण म्हणजे दुसरे लहान पण असते".. त्या स्थितीत पुन्हा नाती बदलतात व मुलांनाच आपल्या आई वडिलांचे पालन पोषण करावे लागते. अगदी लहान मुलांप्रमाणे हट्ट केला तरीही पुरवावा व स्वतःची काळजी घेत नसतील तर प्रेमापोटी रागवावे हिपण त्याचबरोबर रागावणे आणि उपेक्षा करणे यातील फरक जरूर ध्यानी ठेवावा.

रसिकांसाठी वर्षाची सुरुवात इतकी अप्रतिम व्हावी यासारखा आनंद नाही. "या तुफानाला घर जरूर मिळते पण ते रसिकांच्या मनात". 

सलाम सर्व अभिनेत्यांना आणि मराठी चित्रपट सृष्टीलाज्यांनी आजपर्यंत आम्हाला हसवलेरडवले आणि अभिनयाच्या भावनेमध्ये मंत्रमुग्ध केले.

टीप: या लेखामधील मत हे वैयक्तिक असून "नटसम्राट" या चित्रपटावर आधारित आहे. जर लेखामध्ये काही अनावधानाने चूक आढळल्यास जरूर सांगावी. नटसम्राट हे नाटक youtube वर पहायला मिळू शकते https://www.youtube.com/watch?v=Oim1yeSGshg
धन्यवाद.





No comments:

Post a Comment